Tuesday , September 1 2026
Breaking News

डीजेमुक्त गणेशोत्सव अन् ‘एक गाव एक गणपती’वर भर

Spread the love

 

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचा संकल्प; मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांची माहिती

निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणेच डीजेमुक्त व्हावा, यासाठी जिल्हा पोलिस पोलीस प्रमुख, चिक्कोडी जिल्हा पोलीस उपाधीक्षकांनी शांतता कमिटीच्या बैठका बोलावल्या आहेत. यावेळी डॉल्बी, डी.जे. वाले, गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी, शहरा आणि ग्रामीणमधील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या सूचना केल्या जात असल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिली.

निपाणी शहर, उपनगर आणि ग्रामीणमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना छोट्या-मोठ्या मंडळांनी करणार आहेत. काही ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत शेकडो मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. यंदा शहरासह ग्रामीणमधील गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व मंडळांना डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.
गतवर्षी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार तालुक्यांमधील ‘डीजे’ पोलिसांनी जप्त केले होते. यंदाही पोलिसांची पथके फिरणार आहेत. पोलिसांकडे आवाज मोजण्याचे डेसिबल मीटर दिले जाणार आहेत. गावात ‘डीजे’चा दणदणाट सुरू असल्याबद्दल कोणी तक्रार केल्यास त्या मंडळाच्यापदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊन मिरवणुकीतील ‘डीजे’ वाहनासह जप्त करण्यात येणार आहेत.
——————————————————————–
‘गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार डी.जे वाले, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सर्वांना डीजेमुक्त उत्सवाची शपथ दिली जाणार आहे. तत्पूर्वी, ग्रामीणमधील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गणपती मंडळांचे पदाधिकारी, मोहल्ला कमिटी, पोलिस मित्र, प्रतिष्ठीत व्यक्तींना बोलावून त्यांच्या बैठका घेण्याच्याही सूचना पत्राद्वारे पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत. ‘डीजे’ वाल्यांनाही बोलवून सूचना देण्यात येणार आहेत.
-बी.एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक रात्री अपरात्री; नागरिक झोपेत अन् पाणी गटारीत

Spread the love    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विभागाकडून रात्री उशिरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *