बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी पुजारी हिच्या उच्च शिक्षणासाठी संजीवीनी फौंडेशनतर्फे यंदाही शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील अश्विनी हिच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क फौंडेशनतर्फे भरून तिच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले आहे. संजीवीनी फौंडेशनने गतवर्षी अश्विनी हिची शैक्षणिक …
Read More »मराठीतील मतदार फेरनिरीक्षण अर्जाबाबत केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना (Enumeration) अर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या तक्रारीची केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. …
Read More »सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत : मंत्री सतीश जारकीहोळी
बंगळुरू/बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसून आम्ही पूर्वीप्रमाणेच आजही एकत्र काम करत आहोत, असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटात मतभेद असल्याच्या चर्चा …
Read More »मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. अंजली निंबाळकर
बेळगाव : प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केपीसीसीच्या कित्तूर कर्नाटक प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत …
Read More »रामदेव गल्लीत सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदेव गल्ली येथे असलेल्या एका नामांकित सराफी दुकानात शुक्रवारी पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बाजारपेठेतील ‘व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स’ या सराफी दुकानासमोर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एका …
Read More »बेकायदेशीर जुगार, बेटिंगवर पोलिसांचा वॉच; क्लब, रमी क्लब व जिमखान्यांची विशेष तपासणी
बेळगाव : शहरात बेकायदेशीर जुगार, बेटिंग तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलीस विभागाने क्लब, रमी क्लब, जिमखाने आणि इतर मनोरंजन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील अशा संस्थांची …
Read More »धारवाडमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची निर्घृण हत्या; पत्नी ताब्यात, मुलगा जखमी
धारवाड : चिरायु हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची धारवाडमधील कर्नाटक युनिव्हर्सिटी रोडवरील रॅन कास्टेलो अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांचा दहा वर्षीय मुलगा निहील हाही जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस …
Read More »बेळगावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना
बेळगाव : किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात घडली. मृतांची ओळख लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्यावर नातेवाईकांनीच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप …
Read More »पांडुरंगाच्या भेटीची आस राहिली अधुरी; येळ्ळूरच्या पायी दिंडीतील वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
येळ्ळूर : धर्मराज गल्ली येळ्ळूर येथील सौ. शालन प्रकाश सायनेकर (वय 59) वर्षे या सोमवार (ता. 13) रोजी येळ्ळूर येथून निघालेल्या वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर ते पंढरपूर या पायी दिंडीतून चालत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्या अगदी व्यवस्थित दिंडीमध्ये चालत होत्या. गुरुवारी रात्री 1-30 वाजता अचानक …
Read More »23 वर्षांच्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम; युनियन जिमखान्याचा ताबा संरक्षण मंत्रालयाकडे
बेळगाव : शहरातील नामांकित क्रीडा संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनियन जिमखान्याच्या सुमारे 6.5 एकर जागेचा ताबा अखेर संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. तब्बल 23 वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालानंतर शेवट झाला. संरक्षण मालमत्ता कार्यालयाच्या कर्नाटक विभागीय अधिकारी दिव्या एस. होसूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta