Monday , August 31 2026
Breaking News

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

प्रथम आंबा, फणस, जांभूळ, कलम, सावर, इत्यादी जातीची झाडे लावण्यात आली. त्यानंतर दुदाप्पा बागेवाडी यांनी प्रास्तविकमध्ये पर्यावरण विषयी माहिती दिली. राजु पावले यांनी बोलताना फुटूक तलाव स्मशानभूमीत झाडे लावणे गरजेचे आहे कारण ही स्मशान तलावच्या पाळीवर आहे. उन्हाळ्यात अंत्यविधी करतेवेळी सावळीची गरज असते त्याचबरोबर पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर पाणी भरून अनेकवेळा तलाव फूटले आहे. तलावच्या बांधणीसाठी तलावच्या चारी बाजूनी झाडे लावने गरजेचे आहे.

विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडून रस्ते व पांढरे हत्ती तयार केले आहेत. पण आत्ता प्रत्येक माणसाने आपल्या जागेत एक झाडं लावणे गरजेचे आहे आणि आपल्या जीवनातलं एक वर्ष आयुष्य वाढेल असे वामन पाटील यांनी सांगितले व नागेश बोबाटे यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला. या कार्यक्रमाला कृष्णा शहापूरकर, यलुपा पाटील, कृष्णा बिजगरकर, रामा पाखरे, पप्पू कुंडेकर, नामदेव धामणेकर, भरमाणा कंग्राळकर, आभार सतीश देसुरकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

Spread the love  बेळगाव : माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *