Monday , August 31 2026
Breaking News

श्रींच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात

Spread the love

 

रंगकाम सुरू ;विविध मंडळांकडून नोंदणी सुरू

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील गणेश मूर्तिकारांच्या कुशल हातांनी श्रींच्या मूर्तीवर अंतिम हात फिरविणे सुरू असून, पांरपारिकतेला आधुनिक कलाकुसरीची जोड देत विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपांच्या मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतीच्या मूर्तीचे बुकिंग सुरू झाले आहे.
गणेशोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहचली असून पंधरा दिवसावर श्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या मूर्तीची मागणी नोंदविली जाते. त्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांनी यंदा गणरायाचे विविध मनमोहक रूपे साकारली आहेत. पारंपारिक मूर्तीसोबतच कलात्मक आणि आकर्षक मूर्तीना भक्तांकडून पसंती दिली जाते. लालबागचा राजा, दगडूशेठ, बालाजी, बालगणेश अशा विविध मूर्तीचे बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे यंदा घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाच्या विविध रूपांचे दर्शन घडणार आहे.
——————————————————————–
‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विविध रूपातील साडेचार हजार गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. या मूर्तींना यंदाही मागणी नोंदविली गेली आहे.’
-निखिल कुंभार, मूर्तीकार, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयातर्फे झाडांना राखी बांधून अनोखा उपक्रम राबविला

Spread the love  निपाणी (वार्ता) : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *