Monday , August 31 2026
Breaking News

गोकाकमध्ये पहाटे रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांचा छापा

Spread the love

 

 

गोकाक : गोकाक शहरात रविवारी पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा रौडीशीटरांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकून तपासणी केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

डीवायएसपी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सीपीआय श्रीशैल बाकोड, गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते, ग्रामीण पीएसआय के. वालिकर यांच्यासह अंकलगी व कुलगोड पोलीस ठाण्यांचे पीएसआय, एएसआय आणि सुमारे ३५ पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

गोकाक शहरातील काडू सिद्धेश्वर मठाजवळ, उपारगल्ली, जलालगल्ली, जैनबस्ती आदी विविध भागांतील सहा रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांनी एकाच वेळी धाड टाकली. घरांची झडती घेताना शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ तसेच बेकायदेशीर सावकारी किंवा व्याजाच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आहेत का, याची पोलिसांनी तपासणी केली.

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोकाक शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. पोलिसांच्या तपासणीत नेमके काय आढळून आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

Spread the love  बेळगाव : माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *