Monday , August 31 2026
Breaking News

गणेशोत्सवासाठी बेळगाव पोलिसांची ‘सिंगल विंडो’ व्यवस्था

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या सहज आणि एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून ‘सिंगल विंडो’ अर्थात एक गवाक्ष व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पासून शहरातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी, अग्निसुरक्षा, पोलीस परवानगी तसेच इतर आवश्यक परवानग्यांसाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील वर्षीही बेळगाव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सिंगल विंडो केंद्रे सुरू करण्यात आली होती. पोलीस, महानगरपालिका, हेस्कॉम, अग्निशमन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित परवानगी प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

१२ पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सिंगल विंडो केंद्रांवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्राशी संपर्क साधून आवश्यक परवानग्या वेळेत घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच विसर्जन मिरवणुकांचे नियोजन यावर पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे गणेश मंडळांची परवानगी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

Spread the love  बेळगाव : माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *