Monday , August 31 2026
Breaking News

मराठा बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Spread the love

बेळगांव : मराठा बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2025-2026 च्या सरकारी लेखा परिक्षणानुसार बँकेला ऑडीट वर्ग “अ” मिळालेला आहे व बँकेला यावर्षी निव्वळ नफा रु. 2 कोटी 88 लाख झाला असल्याचे सांगितले.

बँकेचे जनरल मॅनेजर श्री. संतोष धामणेकर यांनी 31 मार्च 2026 अखेर अहवालाचे तसेच इतर सभेपुढील विषय वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, नफ़ा विभागणी, अंदाज पत्रक, अन्य विषयांचे तपशीलवार वाचन करुन सविस्तर माहिती दिली.

बँकेचे सभासद सर्वश्री मालोजीराव अष्टेकर, नारायणाराव खांडेकर, महादेव पवार, अमित देसाई, दत्ता जाधव, ईश्वर लगाडे, व्यंकटेश हिशोबकर, विजय जाधव, अॅड. सुधीर चव्हाण, शरद पाटील, दिनेश शिरोडकर, हेमंत पाटील, आनंद आपटेकर व इतरानी चर्चेमध्ये भाग घेऊन एकमताने अहवालाला मंजुरी दिली.

यावेळी बँकेचे संचालक श्री. एल. एस. होनगेकर, दिगंबर पवार, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, मोहन बेळगुंदकर, विनायक होनगेकर, सौ. रेणू किल्लेकर, सौ. दिपाली दळवी, प्रशांत चिगरे, विश्वजीत हसबे, अशोक कांबळे, लक्ष्मण नाईक, बी. बी. खंडागळे, जयराज मोदगेकर, खानापूर शाखेचे उपसमिती सदस्य भरमाणी बेंद्रे, अजित पाटील, प्रकाश निलजकर, सुदर्शन सुळकर, प्रविण पाटील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी व्हा. चेअरमन श्री. शेखर हंडे यानी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *