Monday , August 31 2026
Breaking News

पोस्टमन बी. आर. उमतार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Spread the love

 

बेळगाव : शहापूर पोस्ट ऑफिसातील पोस्टमन भीमाप्पा आर. उमतार हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी शहापूर पोस्ट ऑफिसच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बी. आर. उमतार तसेच त्यांच्या पत्नीचा शाल, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण यांनी उमतार यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव केला. ते म्हणाले, बी. आर. उमतार हे सहकाऱ्यांना नेहमी अचूक मार्गदर्शन करणारे आणि विभागाकडून देण्यात येणारे विविध उद्दिष्टे व टार्गेट जलदगतीने पूर्ण करणारे कर्तबगार पोस्टमन होते.

उमतार यांनी रामदुर्ग, घटकनूर, बेळगाव, वडगाव आणि शहापूर येथे सेवा बजावत नागरिकांना उत्तम व तत्पर सेवा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सेवा बजावत सहकाऱ्यांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली.

यावेळी शहापूरचे पोस्टमास्तर एम. डब्ल्यू. जोशी, एस. पी. कांबळे, आर. जी. अंगडी, पोस्टमन हनुमंत मुतगेकर, सविता जोल्लद यांच्यासह पोस्टल विभागातील कर्मचारी, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी पोस्टमन वेंकटेश मबनूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *