Monday , August 31 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये भव्य इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शन उत्साहात संपन्न

Spread the love

 

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगांव येथे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या भव्य इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय एस्.एम्.सी. कमिटीचे चेअरमन प्रो. आर. के. पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्योती सेंट्रल स्कूलचे संस्थापक चेअरमन डॉ. पी. डी. काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाळेच्या एस्.एम्.सी. कमिटीचे व्हाइस चेअरमन प्रो.श्री.आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री.एन. ए. घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, व्हाइस प्राचार्य श्री. मनोहर करडी, विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार तसेच विविध विषयांच्या प्रकल्पांचे परीक्षण करणारे मान्यवर परीक्षक उपस्थित होते.
या इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शनात विज्ञान, गणित, समाजशास्त्र, कला, संगीत, नृत्य आणि नाटक, शेअर बाजार, करिअर मार्गदर्शन तसेच Food Stall अशा विविध विभागांचा समावेश करण्यात आला होता.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेले Innovative Models, Integrated Projects आणि सर्जनशील सादरीकरण अत्यंत आत्मविश्वासपूर्ण होते.
या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटीव्हीटी, नाविन्यता, क्रिटीकल थिंकींग, संवादशैली आणि टिमवर्क यांसारखी कौशल्ये विकसित करणे तसेच प्रत्यक्ष कृतीतून विविध विषयांचे ज्ञान अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, उत्कृष्ट प्रकल्प आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणांचे उपस्थित मान्यवर, परीक्षक, पत्रकार, पालक आणि पाहुण्यांनी मनापासून कौतुक केले.
ज्ञान, विज्ञान, कला आणि संस्कृती यांचा अनोखा संगम घडवून आणणारे हे इंटरडिसिप्लिनरी प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आणि त्यांच्या सर्जनशील क्षमतेची प्रेरणादायी झलक ठरले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *