Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

वाढत्या अपघातांमुळे येळ्ळूर ग्रामस्थांचा ‘अशोका बिल्डकॉन’ला पुन्हा इशारा

  येळ्ळूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर परिसरातील रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी ‘अशोका बिल्डकॉन’च्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गाठून तीव्र शब्दांत जाब विचारला. रस्त्याच्या संथ गतीचे काम आणि पावसामुळे चिखल-माती रस्त्यावर येऊन सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत येणाऱ्या मातीमुळे रस्त्यावर …

Read More »

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

  बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सर्व नवनिर्वाचित संचालकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रवीण रंगोले यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक …

Read More »

राकसकोपमध्ये पुन्हा जलसंचयाला वेग; पावसाच्या पुनरागमनाने शहरासह बळीराजाला दिलासा

  बेळगाव : जुलैच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावताच बेळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. पाणलोट क्षेत्रासह शहर आणि तालुक्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे जलाशयातील जलसाठा वाढत असून शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. दुसरीकडे, पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांनाही नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाच्या आशा …

Read More »

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून कुटुंब व देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा : मंत्री सतीश जारकीहोळी

  ‘बेडा ब्रो’ अभियानातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती बेळगाव : अमली पदार्थांपासून दूर राहून युवकांनी निरोगी व व्यसनमुक्त जीवन जगावे आणि आपल्या कुटुंबासह देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. बेळगाव शहरातील संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयात मंगळवारी पोलिस विभागाच्या वतीने …

Read More »

नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज : प्रसाद सावंत

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि प्रगतीशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आज गरज” या विषयावर भगतसिंग सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रसाद सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवलिला मिसाळे या होत्या. आपल्या …

Read More »

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : कारचालकाला हिंडलगा तुरुंगात धाडले; मुख्य सूत्रधार प्रफुल पाटील अद्याप फरार

  बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या पुण्यातील कारचालकाची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा प्रफुल पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने त्याचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. …

Read More »

बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

  बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटा कुलमुखत्यारनामा (पॉवर ऑफ ॲटर्नी) आणि बनावट स्वाक्षरींचा वापर करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. कडोली येथील परशुराम धुडुम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपनिबंधक कार्यालयात खोटी स्वाक्षरी आणि बनावट छायाचित्रांचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीला उभे करत मालमत्तेची कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न …

Read More »

बेळगाव विमानतळाला आधुनिकतेचे पंख; २२३ कोटींच्या नव्या टर्मिनलची चाचणी प्रक्रिया सुरू

  बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून ₹२२३ कोटी खर्चाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कार्यान्वयनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इंटिग्रेटेड टेस्टिंग अँड कमिशनिंग (ITC) अंतर्गत विविध यंत्रणा आणि सुविधांची अंतिम चाचणी सुरू असून, लवकरच हे अत्याधुनिक टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. नवीन …

Read More »

गुगलवर डॉक्टरांचा नंबर शोधणे महागात! बनावट ‘अपॉइंटमेंट’च्या जाळ्यात अडकून उद्योजकाला ९८ हजारांचा गंडा

  बेळगाव : डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी गुगलवर शोधलेला मोबाईल क्रमांक एका उद्योजकाला तब्बल ९८ हजार रुपयांचा आर्थिक फटका देऊन गेला. बनावट हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली APK फाईल पाठवत सायबर गुन्हेगारांनी बँक खातेच साफ केल्याची धक्कादायक घटना हनुमान नगर परिसरात घडली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान नगर …

Read More »

रोपलावणीसाठी कुटुंब शेतात; घरात एकट्या वृद्धेच्या गळ्यावर चाकू, भरदिवसा लाखोंची लूट

सोनोलीत धाडसी चोरी; ८ तोळे सोने, २० तोळे चांदी व ५० हजारांची रोकड लंपास, ग्रामीण भागात दहशत बेळगाव : भात रोपलावणीच्या हंगामात घरे ओस पडत असल्याची अचूक रेकी करून चोरट्यांनी भरदिवसा थरारक लूट केली. बेळगावजवळील सोनोली गावात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देत ८ …

Read More »