
बेळगाव – उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूहातर्फे आयोजित ५ व्या कलाश्री लकी ड्रॉ बक्षीस योजनेत कुरबरहट्टी, धामणे गावच्या शिवन्या मनोहर येळ्ळूरकर या ट्रॅक्टरच्या विजेत्या ठरल्या तर भाग्यनगर बेळगावचे प्रसाद चंद्रकांत वंटमुरी हे कारगाडीचे मानकरी ठरले.
शगुन गार्डन, उद्यमबाग येथे कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सामाजिक कार्यकर्ते पी. आर. कुमार, सदानंद शिवानंद, निवृत्त मुख्याध्यापक डी. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक जोतिबा येळ्ळूरकर, जादूगार प्रेमराज पाटील गोवा, चौथ्या कारगाडीचे विजेते कामाशी प्रकाश पाटील डीहोळकर व प्रमुख हितचिंतकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कलाश्री हे सामान्य जनतेची मोठी स्वप्ने पूर्ण करत असलेल्या योजनेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. अनुपस्थित असलेल्या ग्राहकांना फोन करून माहिती देण्यात आली. यावेळी सर्व डीलर्सचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोव्याचे जादूगार प्रेमानंद पाटील यांचे जादूचे प्रयोग झाले. कार्यक्रमासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून हजारो ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाश्री उद्योग समूहाच्या स्टाफने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निखिल पाटील व विनायक बावडेकर यांनी केले, संचालिका सुकन्या डोळेकर यांनी आभार मानले.
कलाश्रीच्या ५ व्या योजनेचे विजेते
१ – १५ महिंद्रा ट्रॅक्टर रु. ९,५०,००० रोख विजेते – शिवन्या मनोहर यळ्ळूरकर, कुरबरहट्टी, धामणे, डीलर नाव : संजय मेळागे, मस्कनाळी.
२ – स्विफ्ट कार रु. ९,४०,००० रोख विजेते – प्रसाद चंद्रकांत वंटमुरी, भाग्यनगर, बेळगाव. विक्रेता : रोटरी क्लब,
३ – बैलजोडी किंवा रु. ९,००,००० रोख व्हाऊचर, विजेता यल्लाप्पा भेरू बिरकाजोगी, हलगा, बेळगाव. विक्रेता : संतोष बांडगी, हलगा.
४ – आयफोन विजेते – सरिता नागेश मंगनाईक, सुभाष गल्ली, येळ्ळूर बेळगाव. विक्रेता : नांगो मजुकर.
५ – कलाश्री ९०० लिटर ४ इन १ होल्डर, विजेते – विराज वीरेंद्र हिरेमठ, इंडीहोळ्ड, पोस्ट : कुरीहाळ, बेळगाव. विक्रेता : परशराम तोंडळे.
यांच्यासह अन्य विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta