Sunday , September 20 2026
Breaking News

सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था; नागरिकांना सांडपाण्यातूनच करावी लागते ये-जा

Spread the love

 

 

बेळगाव : सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे.

विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून, रस्त्यावर पाणी साचल्याने घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाने सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराची पाहणी करून सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *