Sunday , September 20 2026
Breaking News

रिमझिम सरींत रंगली मंगळागौर; तीन पिढ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

 

वेदांत सखीचा मंगळागौर सोहळा उत्साहात; पारंपरिक खेळ, झिम्मा-फुगडी अन् स्नेहभोजनाने वातावरणात रंगत

बेळगाव : पावसाच्या रिमझिम सरींनी प्रसन्न झालेल्या वातावरणात पारंपरिक मंगळागौरीच्या उत्साहाला उधाण आले. ‘मंगळागौर खेळून सांगड घालूया सखी… सर्वजणी’ या भावनेतून वेदांत सखीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.

वेदांत सखीच्या अध्यक्षा मानसी सैनूचे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहा तीरवीर यांच्या निवासस्थानी मंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पारंपरिक पद्धतीने मंगळागौरीची पूजा करण्यात आली. त्यानंतर महिलांनी पारंपरिक खेळ, झिम्मा-फुगडी यांसह विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. महिलांचे ओटी भरण तसेच सामूहिक स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली.

‘एज इज डझंट मॅटर’ हा संदेश देत महिलांनी वयाची बंधने बाजूला सारून उत्साह आणि श्रद्धेने मंगळागौरीच्या खेळात सहभाग घेतला. आधुनिकतेला पारंपरिकतेचा साज चढवत संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

नितल तुळजाई, शितल बेळगांवकर, स्वाती काशीद, पल्लवी सायनेकर आणि सविता सायनेकर यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून हा सोहळा साकारला. वेदांत सखीच्या २० हून अधिक सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष सहभागापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते तीन पिढ्यांचा सहभाग. स्नेहा तीरवीर यांच्या सासू, सून आणि नातसून अशा तीन पिढ्यांनी एकत्रितपणे मंगळागौरीचे खेळ सादर करत कार्यक्रमात सहभाग घेतला. परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपली जात असल्याचे हे सुंदर चित्र यावेळी पाहायला मिळाले.

अखेर सर्व महिलांची ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहभोजनाच्या निमित्ताने परस्परांतील स्नेहबंध अधिक दृढ झाले आणि आनंदी वातावरणात मंगळागौर सोहळ्याची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *