Sunday , September 20 2026
Breaking News

चर्मोद्योग विकास महामंडळाकडून १८ दुकाने मंजूर; गरीब चर्मकार बांधवांना मिळणार रोजगाराची संधी

Spread the love

 

बेळगाव : चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकर) यांच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसर तसेच उत्तर विभागातील गरीब व गरजू चर्मकार बांधवांसाठी सुसज्ज अशा १८ खोकी (दुकाने) मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी लीडकरचे बेळगाव जिल्हा संयोजक ए. आर. रुद्रेशी यांनी लाभार्थ्यांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. या लाभार्थ्यांची खोकी (दुकाने) मंजूर व्हावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते व लीडकरचे सदस्य श्री. संतोष होंगल यांनी विशेष प्रयत्न केले.

बेळगाव शहर परिसर आणि उत्तर विभागातील गरीब चर्मकार बांधवांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात असून, या निर्णयामुळे चर्मकार समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विशेष प्रयत्नांमुळे गरजू चर्मकार बांधवांना स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी दुकाने उपलब्ध होणार असून, त्यांच्या रोजगाराला मोठा हातभार लागणार आहे.

यावेळी हिरालाल चव्हाण म्हणाले की, “चार महिन्यांपूर्वी बेळगाव शहरात २४ खोकी (दुकाने) मंजूर करण्यात आली होती. आज त्या दुकानांच्या माध्यमातून अनेक कुटुंबे आनंदाने व स्वाभिमानाने आपला व्यवसाय करीत आहेत. आता आणखी १८ दुकाने मंजूर झाली आहेत. संतोष होंगल यांच्यासारख्या प्रामाणिक आणि समाजहिताची तळमळ असलेल्या व्यक्तींची समाजाला मोठी गरज आहे. चर्मकार समाजाची प्रगती हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे.”

मंजूर झालेल्या या १८ दुकानांचा वितरण समारंभ लवकरच सन्माननीय आमदारांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *