Sunday , September 20 2026
Breaking News

खडेबाजार पोलिस ठाण्याच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

 

प्रेमप्रकरणातून प्रकार घडल्याची चर्चा; जखमी तरुणावर सिव्हिलमध्ये उपचार

बेळगाव : खडेबाजार पोलिस ठाण्याच्या आवारातच एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मंगळवारी सायंकाळी खळबळ उडाली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंडलगा परिसरातील हा तरुण मंगळवारी सायंकाळी खडेबाजार पोलिस ठाण्यात आला होता. चौकशीदरम्यान तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अचानक त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने उपस्थित पोलिसांची धावपळ उडाली.

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान, प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खडेबाजार पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *