Sunday , September 20 2026
Breaking News

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी अडथळे दूर करा

Spread the love

 

पाणी, स्वच्छता, परवानगीची मानवाधिकार संघटनेची मागणी

निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या समस्या तसेच श्री गणेश विसर्जनातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाने संपणार असून, उत्सव सुरळीत व सुरक्षित पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी फोर जे आर ह्यूमन राइटस ऑर्गनायझेनतर्फे करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्यास मिरवणुकीसाठी मार्ग मोकळा करावा. विसर्जन मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. डॉल्बी, डी.जे. व कर्णकर्कश वाद्य न वाजविण्याबाबत गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी.
मिरवणुकीच्या मार्गावरील खराब रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, पाणी समस्या दूर करणे, स्वच्छता राखणे,रस्त्यांवरील खुले केबल व विद्युत वाहिन्या सुरक्षित करण्याची केली आहे.. गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या घेण्यासाठी उत्सवाच्या किमान दहा दिवस आधी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी. तसेच गणेशोत्सव मंडळ परिसरात रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे वाहन येण्यासाठी जागा सोडावी, अशी ही मागणीही करण्यात आली. यावेळी अशोक खांडेकर, सचिन पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, योगेश कांबळे, अतुल पारळे, प्रशांत पाटील, राहुल ताडे, युवराज शेटके, संतोष मावरकर, गजानन खापे, योगेश पोतदार, संतोष कुरले, उमेश सोनावणे, अविनाश माने, मोरेश्वर थोरात यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *