Sunday , September 20 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेच्या हारुगेरीतील कर्ज मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या हारुगेरी येथील कालिकादेवी भवनात आयोजित कर्ज कर्ज मेळाव्याला परिसरातले ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. परमानंद वाडी येथील सद्गुरु डॉ. अभिनव ब्रह्मानंद स्वामी आणि मान्यवर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य शाखेचे अध्यक्ष किशोर बाली,संस्थेचे संस्थापक सहकाररत्न संस्थापक अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
अध्यक्ष किशोर बाली यांनी, हारुगेरी शहरांमध्ये उद्योगधंदे व शेती विविध उद्योग सुधारण्यासाठी व प्रगती होण्यासाठीआर्थिक बाबीची गरज होती. गरज येथील उद्योग व्यवसायांना देऊन त्यांच्या गरजा भागवून जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेतर्फे आर्थिक सहाय्य करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा हा संस्थेचा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
संचालक प्रताप पट्टनशेट्टी, यांनी, मेळाव्यातील उद्योजक, शेतकरी व समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन केले. संस्थेकडे 750 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण 500 कोटी रुपये इतके केले आहे तसेच संस्थेचे 7000 सभासद असून संस्थेने 6000 हजार कोटी रुपये इतका व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. संस्थेकडे 868 कोटी रुपये खेळते भांडवल आहे. संस्थेची 355 कोटी रुपये इतकी सुरक्षित गुंतवणूक आहे. संस्थेचा स्व मालकीचा निधी 87 कोटी रुपये इतका आहे. संस्थेच्या स्वमालकीच्या 7 इमारती असून संपूर्ण संगणिकृत कोर बँकिंग शाखा आहेत. ३१ मार्च अखेर संस्थेस 10 कोटी 69 लाख इतका नफा झालेला असून संस्थेची 97% इतकी वसुली झाली आहे.संस्था थोड्याच दिवसांमध्ये 1000 हजार कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करत असल्याचे सांगितले.
संचालक प्रताप पट्टणशेट्टी, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, यांच्या हस्ते आमदार महेंद्र तमन्नावर व हरुगेरी शाखा अध्यक्ष व उपाध्यक्ष,संचालक, उपस्थित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मेळाव्यामध्ये सुमारे 12000 उद्योजक, सामान्य व्यापारी ,बिल्डर्स, अभियंते, डॉक्टर्स, शेतकरी, फेरीवाले, लहान दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांनी सहभाग नोंदविला. संस्थेचे सीईओ एस. के. अदन्नावर यांनी कर्जाबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास मुख्य कार्यालय संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, सुरज घोडके, चंद्रकांत हणबर, शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सौंदलगे. सचिन जोडटी, महादेव करनुरे बाबासाहेब मंगसुळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सुनील कबूर यांनी सूत्रसंचालन केले. बी. आर. आजूर यांनी स्वागत केले, महादेव बडगीर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *