
बेळगाव : हेस्कॉमकडून दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात आल्याने बेळगाव शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित भागांत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमच्या शहर विभागाने दिली आहे.
या कालावधीत आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल परिसर, बागलकोट रोड, कलमठ रोड, जुना पी.बी. रोड, फुलबाग गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, आयबी सेंटर, बसस्थानक परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल परिसर, फॉरेस्ट ऑफिस, आरटीओ ऑफिस, कोतवाल गल्ली, डीसीसी बँक परिसर तसेच खडेबाजार शीतल हॉटेलपर्यंतच्या भागाचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय काकतीवेस, शनिवार खूट, खडेबाजार, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी रोड, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एससी मोटर्स परिसर, मारुतीनगर, टेंगिनकेरी गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली आणि भोई गल्ली या भागांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी दुरुस्तीच्या कामाची नोंद घेऊन आवश्यक ती विद्युत उपकरणांची कामे व इतर नियोजन त्यानुसार करून घ्यावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta