
बेळगाव : दि विनर्स सौहार्द सहकारी संघ नियमित, जांबोटी या संस्थेच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन सुरेश शंकर गंभीर आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता गंभीर यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
दि विनर्स सौहार्द सहकारी संघाने गेल्या तीन वर्षांत सहकार व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या या संस्थेने शहरातील नागरिकांना विश्वासार्ह व अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरातील सोमवार पेठ, टिळकवाडी येथे नवीन शाखा सुरू केली आहे.
या शाखेत ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सुरेश गंभीर यांनी केले.
उद्घाटन समारंभाला सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रदीप भांजे, संचालक शिवकुमारय्या कुलकर्णी, विश्वनाथ घाडी, विजयकुमार वडर, समिना सावंत, जयश्री देसाई, रूपा कुलकर्णी, रेणुका गुरव, शाखा व्यवस्थापक संतोष गुरव, शाखा मॅनेजर मनिषा होसुरकर, कर्मचारी गौरी अवलक्की, निकिता यळगुकर, सायली गंभीर व प्रणाली गंभीर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद सावंत यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या बेळगाव शाखेला शुभेच्छा दिल्या.

Belgaum Varta Belgaum Varta