Tuesday , September 1 2026
Breaking News

कारंजीमठ येथे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण; रमाकांत आणि चंद्रकांत कोंडुस्कर यांचा सामाजिक उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : शिवबसव नगर येथील कारंजीमठ, जोतीबा मंदिर परिसर येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून जनतेच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्य करण्यात येतात, त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

परमपूज्य गुरू चंद्रशेखर महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि आशीर्वादाने हा लोकार्पण सोहळा पार पडला. नागरिकांना दुःखाच्या प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने रुग्णालयातून पार्थिव इच्छित स्थळी नेणे तसेच मयत व्यक्तीच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शववाहिका उपलब्ध असणार आहे.

या प्रसंगी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर, श्रीधर अळवणी, जोतीबा कळसेकर, विनायक कृष्णाचे, मारुती गुंडकल, नारायण कोंडुस्कर, शिवराज कोंडुस्कर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सेवेसाठी संपर्क : चंद्रकांत कोंडुस्कर (९४८०७३१०००)

About Belgaum Varta

Check Also

सर्वर डाऊन अन् वीज खंडितमुळे रेशन वितरण रखडले; जिल्ह्यात लाखो नागरिक धान्यापासून वंचित

Spread the love  बेळगाव : रेशन वितरण प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊनची समस्या जैसे थे असून, परिणामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *