
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, मराठी हस्ताक्षर व मराठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये तब्बल ६६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
निबंध स्पर्धा – प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक – रचना धामणीकर (येळ्ळूर),
द्वितीय क्रमांक – आराध्या पावशे (उचगाव),
तृतीय क्रमांक – आराध्या लोहार (मुतगे).
उत्तेजनार्थ – कीर्ती कुबल (मराठी विद्यानिकेतन), सायली सुतार (कोवाड), दक्षता शहापूरकर (हंगरगे) व रोशनी मासेकर (बालिका आदर्श).
निबंध स्पर्धा – माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक – शरयू धर्मोजी (मुतगे),
द्वितीय क्रमांक – श्रेया काकतकर (जिजामाता हायस्कूल),
तृतीय क्रमांक – सृष्टी पाटील (बालवीर विद्यानिकेतन).
उत्तेजनार्थ – सुवर्णा मोदगेकर (निलजी), तेजल कानशिडे (येळ्ळूर), सायली सुतार (सलामवाडी) व वेदांत गावकर (ठळकवाडी हायस्कूल).
हस्ताक्षर स्पर्धा – प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक – भारता चौगुले (मुतगे),
द्वितीय क्रमांक – आस्था मेलगे (येळ्ळूर),
तृतीय क्रमांक – भूमी पवार (कोवाड).
उत्तेजनार्थ – कल्याणी हलगेकर (मराठी विद्यानिकेतन), स्वरा पाटील (बालवीर विद्यानिकेतन), प्रांजल देसाई (बालिका आदर्श) व आरूषी पाटील (हंगरगे).
हस्ताक्षर स्पर्धा – माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक विभागून – हर्ष पाटील व अनन्या चौगुले (मराठी विद्यानिकेतन),
द्वितीय क्रमांक – सोनाक्षी पाटील (मुतगे),
तृतीय क्रमांक – स्नेहा पाटील (सुंडी).
उत्तेजनार्थ – समीक्षा काकतकर (बालिका आदर्श), श्रावणी मांडोळकर (शानभाग), नंदिनी कुंभार (कोवाड), संभाजी पाटील (बेनकनहळ्ळी) व दिव्या जाधव (इदलहोंड).
मराठी व्याकरण स्पर्धा – माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक – वैष्णवी कुंडेकर (येळ्ळूर),
द्वितीय क्रमांक – मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन),
तृतीय क्रमांक – युवराज सनदी (हंदीगणूर).
उत्तेजनार्थ – प्रेरणा पाटील (मराठी विद्यानिकेतन), श्रेया प्रकाश लाड (बालिका आदर्श), रिषभ सुतार (बालवीर विद्यानिकेतन), सरोजा शिंदे (कुद्रेमणी), भूमी पाटील (ठळकवाडी हायस्कूल), अपर्णा पाटील (सुंडी) व किरण तरळे (आंबेवाडी).
मराठी व्याकरण स्पर्धा – प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक – पूर्वी रमेश गाडी (येळ्ळूर),
द्वितीय क्रमांक – गार्गी मोरे (मराठी विद्यानिकेतन),
तृतीय क्रमांक – तनिष्का बेळगुंदकर (बालवीर विद्यानिकेतन).
उत्तेजनार्थ – कार्तिकी मोर्ये (सुंडी), श्रेया सावंत (मराठी विद्यानिकेतन), आसावरी कुंभार (शानभाग), प्रतीक्षा गौंड्याळकर (शहापूर), श्रेया नाकाडी (बालवीर विद्यानिकेतन), धनश्री कोळसेकर (बालिका आदर्श) यांनी यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, या यशस्वी विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या बालसाहित्य संमेलनात रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रबोधिनीतर्फे देण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta