Friday , November 6 2026
Breaking News

नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून स्वागत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने त्यांचे बेळगाव नगरीत अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागत

महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. रमाकांत (दादा) कोंडुसकर यांनी नवीन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांना पुष्पगुच्छ आणि आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कायदा व सुव्यवस्थेसाठी महामंडळाचे पूर्ण सहकार्य : रमाकांत दादा कोंडुसकर

काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव हा बेळगावचा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर म्हणाले, “गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता, आनंद आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महामंडळ पूर्ण ताकदीने पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभे राहील. प्रशासनाला सर्व बाबींमध्ये आमचे सदैव सहकार्य लाभेल.”

लवकरच व्यापक बैठक घेणार : पोलीस आयुक्त निकम

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “बेळगावचा ऐतिहासिक गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. उत्सव अधिक चांगल्या रीतीने साजरा होण्यासाठी आणि नियोजनासाठी अत्यंत जलद गतीने सर्व मंडळांची एक व्यापक बैठक बोलवण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित

या स्वागतप्रसंगी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सागर पाटील, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर, सचिन पाटील यांच्यासह महामंडळाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *