Sunday , October 4 2026
Breaking News

सर्वेश कंग्राळकर खून प्रकरणाचा छडा; चौघांना अटक

Spread the love

 

 

जुन्या वैमनस्यातून अपहरण करून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा; ‘ती सुंदरी’ कोण? याचा तपास सुरू

बेळगाव : गांधीनगर परिसरातील तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सर्वेश ऊर्फ नाना कंग्राळकर यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात माळमारुती पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी शशी जालगार, राहुल जालगार, दशरथ राजपूत आणि अरुण हुल्लोळी या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

२०२५ मधील वादातून हत्या?

पोलिसांच्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून २०२५ मध्ये सर्वेश कंग्राळकर याने शशी जालगार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. त्याच वैमनस्यातून शशी जालगार याने साथीदारांच्या मदतीने सर्वेशचे अपहरण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

त्यानंतर नानावाडी परिसरात सर्वेशची हत्या करून त्याचा मृतदेह खानापूर तालुक्यातील जांबोटी परिसरात टाकून आरोपी पसार झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘ती सुंदरी’ कोण?

दरम्यान, या हत्या प्रकरणात सोशल मीडियावरून सर्वेशच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीची भूमिकाही तपासली जात आहे. इन्स्टाग्रामवर संदेशाद्वारे सर्वेशशी तिची ओळख झाली होती. तिने त्याला घरी कोणी नसल्याचे सांगून बोलावले होते, अशी माहिती तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या तरुणीच्या संपर्कानंतर सर्वेश बेपत्ता झाला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जांबोटी परिसरात आढळून आला. त्यामुळे तिचा या हत्याकांडाशी नेमका संबंध काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

माळमारुती पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीचा तपास करत विविध दिशांनी चौकशी केली. त्यातून चौघा संशयितांचा माग काढून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपी तसेच संबंधित तरुणीचा शोध सुरू असून, पुढील तपासात हत्येमागील संपूर्ण कट उघड होण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *