Sunday , October 4 2026
Breaking News

अक्कोळमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी : सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथे गणेश नगर भागात पांगिरे (ए) चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन कुलूप बंद घरांना लक्ष्य केले आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गणेश नगरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेशनगर भागातील पांगिरे (ए) रस्त्यालगत असणाऱ्या वसाहती मधील विठ्ठल सिद्धाप्पा पडोळकर यांच्या बंद घराचे कडी कोंयंडा ऊचकटून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. दोन तिजोऱ्या मधील कपडे, कागदपत्रे विस्कटून रोख रक्कम व दागिने लंपास केले. त्याच घरामधील देवाऱ्यामधील देवाच्या गळ्यातील दागिने व इतर वस्तूला हात न लावता चोरटे गायब झाले. हे कुटुंब मेंढपाळ व्यवसाय करत असून ते जत तालुक्यामध्ये आपली बकरी चरावयास नेली असता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून पैसे दागिने लंपास केले. आतापर्यंत या घरांमध्ये दोन वेळा चोरी झाली आहे. या चोरीनंतर चोरट्यांनी सिद्धाराम गुरुपाद खिलारे त्यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला. या घरातही कोणी नसल्याचे पाहून तिजोरील सर्व साहित्य विस्कटून टिक्का, दोन गळ्यातील पेटी, अंगठी सह रोख रक्कम ‌लंपास केली. या घरामधील नागरिकसमोरच्या घरामध्ये झोपायला गेले असता याचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
सोळांकुरे गल्लीमधील राहणाऱ्या गरीब कुटुंबातील रहिवाशी सुशीला बाळू इंदलकर यांच्या घराचे कडी कोंयंडा कुलूप तोडून तिजोरी मधील साहित्य विस्कटून गेले. याशिवाय जेवण खोलीमध्ये जाऊन जेवणाचे डबे खाली पाडून त्यांनी आणलेल्या पेन्शन मधील पैसे बँक पासबुकमध्ये पाच हजार रुपये ठेवले होते. ते पैसे चोरून नेले. घटना रात्री दोनच्या पुढे चोरट्याने केली असावा अंदाज नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिन्ही घरामध्ये झालेल्या चोरीची घटना कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, पोलीस राजू कडसालकर, रामगोंडा पाटील यांनी पाहणी करून पंचनामा केला.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *