


खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी गावात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील जेके कॉम्प्लेक्ससमोर सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसून आला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अंधारात बिबट्या गावातून फिरत असल्याचे दृश्य सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
बिबट्या पुन्हा गावात येण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना होईपर्यंत नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta