Sunday , October 4 2026
Breaking News

मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

Spread the love

 

ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दराची मागणी; पोलिसांशी धक्काबुक्की

हुबळी : ऊसाला योग्य दर मिळावा, साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवावा आणि शेतकऱ्यांसाठी नव्या एफआरपीची निश्चिती करावी, या मागण्यांसाठी हुबळीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मंगळवारी तीव्र स्वरूप आले. विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

चेन्नम्मा चौकातून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर निश्चित करण्याची मागणी केली. तसेच साखरेचा सध्याचा किमान विक्री दर ३१ रुपयांवरून ६० रुपये करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

इंचिगेरी मठाचे शशिकांत गुरूजी यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी योग्य मोबदला मिळावा आणि नव्या एफआरपीमध्ये न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी चेन्नम्मा चौकातून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. निवासस्थानाजवळ पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद, धक्काबुक्की आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आंदोलकांना रोखले.

About Belgaum Varta

Check Also

परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांकडे जमा करा : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love    बेंगळुरू : परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी येत्या १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या हद्दीतील पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *