


बेळगाव : इंदोर मध्यप्रदेश येथील केशव विद्यापीठ आवासिया विद्यालयाच्या मैदानावर विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था आयोजित राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येतील संत मीरा शाळेच्या 17 वर्षाखालील मुलांचा संघ रवाना झाला आहे. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालेल्या संत मीरा शाळेच्या संघात कर्णधार अनिरूध्द हलगेकर, उपकर्णधार संचित धामणेकर, गोलरक्षक आर्यन कलखाबकर, यश हळशीकर, श्रेयस किल्लेकर, पृथ्वीराज बजंत्री, उत्कर्ष कणसे, कुणाल लोहार, प्रणव सुतार, हॅरिस पिरजादे, मोहित कणवाडीया संघासोबत प्रशिक्षक शिवकुमार सुतार, सुमित सौंदत्ती रवाना होत आहे. या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यिपीका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta