Sunday , October 4 2026
Breaking News

साई कॉलनीत घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Spread the love

 

माळमारुती पोलिसांत तक्रार

बेळगाव : महांतेशनगर परिसरातील साई कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी 25 ते 26 सप्टेंबरदरम्यान घडली असून, याप्रकरणी रविवारी माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साई कॉलनी येथील रहिवासी बसवराज नागय्या गंगाधर मठ यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

फिर्यादीनुसार, चोरट्यांनी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि सुमारे 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. याशिवाय घरातील दहा हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी पळविली.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण सुमारे तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची नोंद माळमारुती पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *