


कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलचा इ.दहावीत शिकणारा गुणवंत खेळाडू श्रीनाथ चंद्रकांत निलजकर याची जिल्हा स्तरावर गोळा फेक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल, मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला जातो. श्रीनाथ निलजकरने सतरा वर्षे खालील वैयक्तिक गोळा फेक स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर यशस्वी झेप घेतली. विशेषता शेतकरी कुटुंबातील गरजू, होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी संस्था रोख रक्कम देऊन सन्मानित करते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक, कार्याध्यक्ष पी आर गावडे, एम पी मोरे, लक्ष्मण जाधव, वाय एन बुरुड, निवृत्त मुख्याध्यापक बी बी देसाई, बिजगर्णी हायस्कूल मुख्याध्यापक रमेश कांबळे, निवृत्त क्रीडा शिक्षक के आर भास्कर, प्रा.सौ.सोनाली कांबळे, के जी मेणसे, विजय सावी, शिक्षिका किरण बा. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta