Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चा स्केटर देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची जागतिक स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे सिटी येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. देवेन हा के.एल.एस. जी.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेजचा, तर साईराज हा आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी आहे. भारतीय संघाच्या निवड चाचण्या भुवनेश्वर (ओडिशा) आणि मोहाली …

Read More »

कावळेवाडीत दुर्गामाता नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ

  कावळेवाडी : येथील श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात रोवण्यात आली. गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून मुहूर्तमेढ मिरवणूक काढण्यात आली. मंडळाच्या वतीने सलग तेराव्या वर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. गावडू एम. मोरे यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढीची विधिवत पूजा करून ती रोवण्यात आली. यावेळी …

Read More »

युवा समिती आणि ‘राज्य मराठी विकास’ संस्थेचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा

  बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या वक्तृत्वकलेला आणि विचार मांडण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य …

Read More »

सामान्य माणसाच्या वापरातूनच भाषा टिकते

    शिवानंद महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विशेष व्याख्यान कागवाड : कोणत्याही दबावामुळे भाषेचे अस्तित्व नष्ट होत नाही. सामान्य माणूस जेव्हा एखाद्या भाषेपासून फारकत घेतो, तेव्हाच त्या भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून माणसांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हिंदी भाषेने भारतातील विविध प्रांतांतील लोकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण …

Read More »

विसर्जनास विलंब; चार मंडळांवर गुन्हे

    परवानगी अटींचे उल्लंघन; टिळकवाडी, खडेबाजार पोलिसांची कारवाई बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जनासाठी निर्धारित वेळेचे पालन न करता मिरवणूक लांबविणाऱ्या चार गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टिळकवाडी पोलिसांनी दोन, तर खडेबाजार पोलिसांनी दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी बेळगावात ५ ऑक्टोबरपासून करिअर कौन्सेलिंग कॅम्प

  बेळगाव : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, कौशल्ये आणि क्षमतांची योग्य ओळख करून घेता यावी तसेच भविष्यातील करिअरच्या दिशेबाबत माहितीपूर्ण निर्णय घेता यावा, यासाठी ५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बचपन प्ले स्कूल, मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे करिअर कौन्सेलिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प दररोज सकाळी १० …

Read More »

पतंगाच्या नादात दुसऱ्या मजल्यावरून पडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

  वडगावातील धामणे रोडवर दुर्दैवी घटना बेळगाव : पतंग पकडण्याच्या नादात दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडगावातील धामणे रोडवरील निजामिया नगर परिसरात मंगळवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साद मंजूरअली टिनवाले (वय ९) …

Read More »

कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला अखेर मुहूर्त!

  जिल्हा रुग्णालयातील जुन्या ब्रिटिशकालीन इमारती जमीनदोस्त; १.३ एकर जागेचे सपाटीकरण सुरू ५० कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या संभाव्य दौऱ्यात भूमिपूजनाचे नियोजन बेळगाव : उत्तर कर्नाटकातील कर्करोग रुग्णांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला अखेर प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रस्तावित असलेल्या …

Read More »

उचगावच्या मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीची ३२ वी वार्षिक सभा उत्साहात

  उचगाव : येथील श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर-पार्वती मंगल कार्यालयात संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने सभेची सुरुवात झाली. संचालक चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते श्री मळेकरणी देवीच्या …

Read More »

मायमराठीच्या अस्तित्वावरच घाला?

  (-शिवानी उमेश पाटील) दावा सीमाप्रश्न न्यायालयात असताना महापालिकेचा एकतर्फी ठराव; मराठी नगरसेवकांच्या राजकीय सोयीवरही संतप्त सवाल बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात सीमाप्रश्नाच्या विरोधात ठराव मांडला गेला. वरकरणी ही एक प्रशासकीय प्रक्रिया वाटू शकते; पण तिच्या मुळाशी जाऊन पाहिले तर हा प्रकार केवळ एका ठरावापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे लोकशाहीच्या मर्यादांचा, …

Read More »