Sunday , October 4 2026
Breaking News

विद्यार्थ्यांसाठी बेळगावात ५ ऑक्टोबरपासून करिअर कौन्सेलिंग कॅम्प

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, कौशल्ये आणि क्षमतांची योग्य ओळख करून घेता यावी तसेच भविष्यातील करिअरच्या दिशेबाबत माहितीपूर्ण निर्णय घेता यावा, यासाठी ५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बचपन प्ले स्कूल, मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे करिअर कौन्सेलिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कॅम्प दररोज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित केला जाणार आहे. इयत्ता ८वी, ९वी, १०वी, PUC प्रथम व द्वितीय वर्ष तसेच विविध पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या कॅम्पचा लाभ घेता येणार आहे.

जंप अप हाय – करिअर कम्पासचे संस्थापक आणि Certified Career Analyst प्रसाद एस. प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमधील आवडी, कौशल्ये व क्षमता, व्यक्तिमत्त्व, शिकण्याची शैली आणि योग्य करिअर पर्याय याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत या कॅम्पला भेट देऊन करिअरच्या विविध पर्यायांबाबत चर्चा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

स्थळ : बचपन प्ले स्कूल, मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव
दिनांक : ५ ते ३१ ऑक्टोबर
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
संपर्क : +91 80733 24496

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *