Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

केसरेकर दांपत्याच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ बेळगावात मराठी भाषिकांचा एल्गार!

  ‘नराधमाला फाशी द्या, न्याय मिळालाच पाहिजे’च्या घोषणांनी दणाणले शहर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : “फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या… न्याय हवा आहे, न्याय मिळालाच पाहिजे!” अशा संतप्त घोषणांनी शुक्रवारी बेळगाव शहर दणाणून गेले. सांगली-कुपवाड येथील केसरेकर दांपत्याच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ समस्त मराठा समाज आणि मराठी भाषिक एकवटले. सरदार …

Read More »

देसूरमध्ये गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

  देसूर : देसूर गावातील मुख्य रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक, कचरा आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, महिला, लहान मुले तसेच पादचाऱ्यांना याच घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम असून, वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही अद्याप …

Read More »

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा

  मुदतठेवींचे नूतनीकरण करण्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांचे आवाहन बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून सभासदांना यंदा १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांना अधिक बळकटी देण्यासाठी मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी आपल्या …

Read More »

सांगलीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ बेळगावात उद्या मराठा समाजाचा भव्य मोर्चा

  बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मराठा समाजातील कष्टकरी दाम्पत्याची निर्घृण हत्या करून त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांना अनाथ करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी असलेल्या केसरेकर कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे …

Read More »

बेळगाव शहरातून सराईत आरोपीची हद्दपारी; सहा गुन्ह्यांची नोंद

  बेळगाव : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. सुरेश मुनिस्वामी जालगार (वय ४१, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याला बेळगाव शहरातून हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश जालगार हा सन २००५ पासून मारामारी, लुटमार, जुगार, …

Read More »

शारदा विद्यालयात मोफत नेत्रतपासणी शिबिर

    बेळगाव : शहापूर येथील शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. स्वाती घोडेकर यांनी नेत्रतज्ञांचे स्वागत केले. यावेळी यशवंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आरोग्य, डोळ्यांची योग्य …

Read More »

चनम्मा नगर, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत बेळगाव : चनम्मा नगर, डबल रोड, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री करणाऱ्या उचगाव येथील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून गांजा विक्री करताना सागर सुरेश मोरे (वय २९, रा. उचगाव) याला रंगेहाथ अटक …

Read More »

रेशनधारकांना दिलासा! ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती

  सर्व्हरवरील ताणामुळे निर्णय; १ सप्टेंबरपासून प्रक्रिया पुन्हा सुरू बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या सदस्यांची दर पाच वर्षांनी करण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कोट्यातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित केले जात असल्याने लाभार्थ्यांना दोन वेळा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागत आहे. …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा; तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक डागडुजी करावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली. तालुक्यातील …

Read More »

बालमनातील कवितेतून संस्कार आणि समाजप्रबोधन घडावे : निळूभाऊ नार्वेकर

  बेळगाव येथे दुसरे बालकवी संमेलन उत्साहात; ५७ बालकवींनी सादर केल्या कविता बेळगाव : बालमनातील कविता प्रत्येकाच्या मनाला भावणारी आणि गोड वाटणारी असते. कवितेतील भावार्थ, रचनेमागील अंतर्मन आणि शब्दांचा अर्थ यांना विशेष महत्त्व असते. केवळ शब्दांची जुळवाजुळव करून कविता रचल्याने तिच्यात साहित्यिक मूल्य निर्माण होत नाही. रचनात्मक कविता समाजाला प्रेरणा, …

Read More »