Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

    रायबाग : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मडलगी गावात ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख कल्लव्वा सदाशिव मरडी अशी झाली आहे. ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक …

Read More »

अनगोळ मेन रोडवर महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीवरून चोरटे पसार

  बेळगाव : अनगोळ मेन रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसडा देऊन लांबविल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुटुंबीयांसह अनगोळ मेन रोडवरील एका हॉटेलमध्ये नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आणि जेवण आटोपल्यानंतर कुटुंबीय हॉटेलबाहेर पडले. महिला हॉटेलसमोरील कारकडे …

Read More »

मांजाने घेतला तरुणाचा बळी; महामार्गावर दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगावातील गांधीनगरजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मृत तरुणाचे नाव ध्रुव संतोष करजगी (वय १९) असून तो महांतेशनगर येथील रहिवासी होता. ध्रुव हा दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. मांजामुळे गळ्याला गंभीर …

Read More »

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी एस.जी. चिगुळकर तर कार्यदर्शीपदी एम. बी. अंगडी

  राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर बेळगाव : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ (र) बेंगळूर, बेळगाव जिल्हा घटक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर तर कार्यदर्शीपदी बेळगाव बेनस्मित …

Read More »

बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

  बेळगांव : बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्साहात पार पडली. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते. कार्यकारिणी सदस्य शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केल्यावर प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश काकडे यांच्या पत्नी तुळसा व सदस्या मनिषा सुभेदार यांच्या …

Read More »

एसआयआर प्रकरणात भाजप नेते रवी पाटील यांच्यासह २५ जणांवर गुन्हा

  १९८ मतदारांची नावे हटविण्यासाठी बनावट अर्ज केल्याचा आरोप; बेळगावच्या मार्केट पोलिसांत एफआयआर बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अल्पसंख्याक समाजातील १९८ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटी माहितीच्या आधारे फॉर्म क्रमांक ७ सादर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० …

Read More »

नियंत्रण सुटून दुचाकी डिव्हायडरला धडकली; १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

    बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी गांधीनगर परिसरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली. ध्रुव कर्जगी (१९, रा. महांतेशनगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात ध्रुव याचा घटनास्थळीच …

Read More »

मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता सकारात्मकतेची वाट दाखवा

  प्रा. डॉ. संजीवनी खंडागळे; रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा व गुणवंत पाल्यांचा गुणगौरव निलजी : मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता त्यांच्या बुद्धीला सकारात्मकतेची वाट दाखविली, तरच ते भविष्यात उत्तम नागरिक घडतील. पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी, अडचणी आणि भावना जाणून घ्याव्यात. संवादातून कुटुंबातील जिव्हाळा व …

Read More »

वृंदावन कॉलनीतील मैदानावर शेडला नागरिकांचा विरोध : रमाकांत कोंडुस्कर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

  दोन दिवसांत शेड हटविण्याची मागणी बेळगाव : भाग्यनगर (५वा क्रॉस) येथील वृंदावन कॉलनीतील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर उभारण्यात येत असलेल्या शेडला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांनी महानगरपालिकेकडे या बांधकामाबाबत तक्रारी करून मैदानावर कोणतेही शेड अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करू नये, अशी मागणी …

Read More »

कंत्राटदारांच्या ३८ हजार कोटींच्या थकीत बिलांवरून शेट्टरांचा हल्लाबोल

  डी.के. शिवकुमारांनी असंवेदनशील वक्तव्ये थांबवावीत; मठाधीशांवरील वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर तसेच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या कार्यपद्धतीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात जोरदार टीका केली. कंत्राटदारांच्या संघटनेने राज्यात सुमारे ₹३८ हजार कोटींची बिले थकीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रश्नावर डी.के. शिवकुमार यांच्याकडून …

Read More »