Sunday , October 4 2026
Breaking News

मांजाने घेतला तरुणाचा बळी; महामार्गावर दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगावातील गांधीनगरजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मृत तरुणाचे नाव ध्रुव संतोष करजगी (वय १९) असून तो महांतेशनगर येथील रहिवासी होता.

ध्रुव हा दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून मांजा महामार्गावर कशी आली, याचा शोध घेतला जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यालगत पतंग उडविताना तसेच प्रतिबंधित मांजाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *