


राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ (र) बेंगळूर, बेळगाव जिल्हा घटक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर तर कार्यदर्शीपदी बेळगाव बेनस्मित हायस्कूलचे एम. बी. अंगडी यांची एकमताने निवड करण्यात आली.
बेळगाव टिळकवाडी येथील जी.जी.चिटणीस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली व नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी होते. प्रारंभी सरस्वती फोटो पूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रधान कार्यदर्शी उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक भाषणात बेळगाव जिल्हा कार्यकारणीच्या निवडी संदर्भात व पदग्रहण सोहळा संदर्भात माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. अक्षता मोरे यांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर उमेश कुलकर्णी यांनी जिल्हा कार्यकारणीची नावे घोषित केली. राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी व राज्य उपाध्यक्ष चिदानंद पाटील जी व राज्य सचिव आर.पी. वंटगुडी यांनी नूतन कार्यकारणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नुतन कार्यकारिणी अशी -अध्यक्ष- सुनील चिकुळकर (कणकुंबी हायस्कूल), कार्यदर्शी -एम.बी. अंगडी (बेनस्मित हाय.), सहकार्यदर्शी-पवन पाटील, उपाध्यक्ष-संजीव कोष्टी (ठळकवाडी हाय.), बी.जी हिरेमठ (शरमण हाय.), नागेश डोणकरी (बालिका आदर्श), डॉ नवीन शेट्टीगार (चिटणीस हाय.), महिला प्रमुख चंदा नरसगौडा (विज्ञान विकास हाय), खजिनदार -जे.एम.पाटील (मणतुर्गा हाय.), ऑर्गनायझिंग सेक्रेटरी-वसंत पाटील, जॉईंट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी विश्वास गावडे (बालिका विद्यालय), जिल्हा डायरेक्टर म्हणून संजय पवार, सी.आय पाटील (नंदगड), सिद्धाप्पा नाईक (गंदिगवाड), महेश सडेकर (जांबोटी), सचिन कुडची (न्यु गर्ल्स), वाय.के पाटील, पी ए पाटील (शिवठाण), एम वाय पाटील (बेळगुंदी हाय.), बी.जी. पाटील(हलशी हाय.), एन डी पाटील (लोंढा) व जे.यु. घाडी (न्यु गर्ल्स) तर सल्लागारपदी उमेश कुलकर्णी, विश्वजीत हसबे, दयानंद तारिहाळकर, राजाराम कुडतुरकर, अशोक परमोजी, अरुण पाटील, सुरेश कळ्ळेकर, एन डी पाटील, वामनराव कुलकर्णी, परशराम गोरल, पी.ओ. धामणेकर, एल बी नाईक, अनिल कदम व अशोक अण्णीगेरी.
यावेळी राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी, उपाध्यक्ष चिदानंद पाटील जी, नुतन जिल्हा अध्यक्ष सुनील चिगुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन बी.जी. हिरेमठ यांनी केले तर एम.बी. अंगडी यांनी आभार मानले.
याप्रसंगी बेळगाव शहर, खानापूर तालुका व बेळगाव ग्रामीण अशा विविध तालुक्यातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta