


बेळगांव : बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्साहात पार पडली. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते.
कार्यकारिणी सदस्य शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केल्यावर प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश काकडे यांच्या पत्नी तुळसा व सदस्या मनिषा सुभेदार यांच्या मातोश्री शुभांगिनी देशपांडे या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिषद प्रतिनिधी शेखर पाटील यांनी हा ठराव मांडला.
यानंतर अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी अहवाल सालातील पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली.
इंडियन एक्स्प्रेच्या प्रतिनिधी रितीका चोप्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या एकाधिकारशाहीचा पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखविले याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. यानंतर कार्यवाह महेश काशीद यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, २०२५ -२०२६ सालचा जमाखर्च व २०२६-२०२७ सालीचे अंदाजपत्रक यांचे वाचन केले. त्यास मंजुरी देण्यात आली.
विलास अध्यापक, विकास कलघटगी, डी. के. पाटील, राजेंद्र पोवार आदींनी यावेळी विविध सूचना केल्या. उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांनी आभार मानले. पत्रकार भवनमध्ये झालेल्या या सभेस बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta