Sunday , October 4 2026
Breaking News

समाधी मठातील गोशाळा भक्त सागर श्रीखंडे यांची सेवेतून मुक्तता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील चिककोडी रोडवरील रूपाक्षलिंग समाधी मठात मठाधिपती प्राणालिंग स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रम, गोशाळा, विद्यार्थी वस्तीगृहासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. येथे सेवा करणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे. येथे गोशाळेची सेवा करण्यासाठी यमगर्णी येथील सागर श्रीखंडे हे भक्त कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाचे संरक्षण करून समाधी मठातील गोशाळेत त्यांची सेवा करत होते. पण अचानक त्यांनी मठाच्या नावाचा दुरुपयोग करून दुष्कृत्य केल्याचे समजले आहे. त्यामुळे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समाजाची बैठक घेऊन श्रीखंडे यांना सेवा मुक्त केले आहे. या पुढील काळात समाधी मठाशी त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. या पुढील काळात चारा, देणगी, असे साहित्य अशा उपक्रमाबाबत समाधी मठाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राणलिंग स्वामी यांनी केले आहे.
प्राणलिंग स्वामी यांनी दिलेली माहिती अशी, मठातर्फे अनेक वर्षापासून विविध सण, उत्सव, जयंत्या साजरा करण्यासह सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. वसतीगृहामध्ये ६० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शिकवणी वर्ग, राहणे मोफत भोजनाची व्यवस्था केली जात आहे. सेवाकाळात समाधी मठात श्रीखंडे यांनी समाधी मठासह गो शाळेसाठी विविध कामे केली आहेत. पण त्यांनी चुकीचे वागल्याचे समाज माध्यमातून समजल्यानंतर त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे समाधी मठाने त्यांना सेवा मुक्त केले आहे. याची शहर आणि परिसरातील भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्राणलिंग स्वामी यांनी केले आहे. यावेळी समाधी मठातील संचालक आणि भावीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *