


बेळगाव : अनगोळ मेन रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसडा देऊन लांबविल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुटुंबीयांसह अनगोळ मेन रोडवरील एका हॉटेलमध्ये नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आणि जेवण आटोपल्यानंतर कुटुंबीय हॉटेलबाहेर पडले. महिला हॉटेलसमोरील कारकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा देत ते लांबविले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. मात्र, तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून अनगोळच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta