


विविध हिंदू संघटनांची मागणी; नामदेव मंदिरात बैठक
निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मात प्राचीन काळापासून गोमातेस अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र मठाचे नाव वापरून सागर श्रीखंडे यांनी गोतस्करांशी हितसंबध ठेवून गोमातेशीच प्रतारणा केली आहे. अशा व्यक्तीवर कडक कारवाई करून यापाठीमागे आणखी कोणी सहभागी आहे काय, याचा पोलिस प्रशासनाने शोध घ्यावा. गो रक्षणाच्या नावाखाली कसायांबरोबर अर्थिक हितसंबध ठेवून स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला आहे.
त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील विविध हिंदू संघटना आणि सकल हिंदू समाजातर्फे संत नामदेव मंदिरात आयोजित बैठकीत करण्यात आली.
अजित पाटील यांनी केले. निपाणी परिसरातील नागरीकांनी श्रीखंडे यांच्याशी मठाच्या नावाखाली यापुढे कुठलेही व्यवहार करू नयेत असे अवाहन करण्यात आले.
अमोल चेंडके यांनी, सागर श्रीखंडे याचा हिंदू संघटनेशी कुठलाही संबंध नसून त्याला यापूर्वीच संघटनेतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. अॅड. सुषमा बेंद्रे यांनी मठाच्या नावाखाली श्रीखंडे याने बेकायदेशीरपणे अनेक संशायास्पद व्यवहार केले आहेत. अनेक कसायांबरोबर अर्थिक व्यवहार करून स्वतःचे पोट भरले आहे. अशा प्रवृत्तीचा भांडाफोड झाल्याचे सांगितले.
नवनाथ घाटगे म्हणाले, तवंदी घाटात गौमांस तस्करीचे वाहन सापडल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी श्रीखंडे याचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याने हिंदू हेल्पलाईनच्या नावाखाली अनेक बेकायदा कृत्ये केली आहेत. अनेक अर्थिक व्यवहार करण्यासह मठाच्या नावाखाली चारा व पैशाच्या स्वरूपात देणगी गोळा केल्याचे सांगितले. अजित पारळे, राजू पुरंत, सुशांत कांबळे, श्रेयस आंबले, नरेश सवदी, उत्तम कामते यांनीही मनोगत केले.
बैठकीस बबन निर्मळे, विनायक महाजन, पवन मिरजे, चारूदत्त पावले, राजू सुतार, युवराज जाधव उपस्थित होते. अभिनंदन भोसले यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta