Sunday , October 4 2026
Breaking News

ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

Spread the love

 

 

रायबाग : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मडलगी गावात ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख कल्लव्वा सदाशिव मरडी अशी झाली आहे.

ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची तपासणी करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. हा मृत्यू हत्या आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांच्या तपासानंतरच महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *