


बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी गांधीनगर परिसरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली.
ध्रुव कर्जगी (१९, रा. महांतेशनगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात ध्रुव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघाताची नोंद बेळगाव उत्तर वाहतूक पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta