Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने उत्कृष्ट कामगिरी करून एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची भरघोस कमाई केली. 4 x 100 मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये कर्नाटक राज्य संघात समाविष्ट असलेल्या दिशाने सुवर्णपदकाची कमाई केली तर 50 मीटर फ्रीस्टाइल …

Read More »

ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत साजरा करा; डीजेला पूर्णपणे बंदी

  बेळगाव : ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी तसेच सीरत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत डीजेला …

Read More »

कर्जाच्या विळख्यात विणकर कामगाराची जीवनयात्रा संपली; राहुल जारकीहोळींकडून कुटुंबाला धीर

  बेळगाव : कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून मंगाईनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विठ्ठल निंगाप्पा लोकरे (४२) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी …

Read More »

बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार; बेळगावात पुतळा दहन, रास्ता रोको अन् जेलभरो

  बेळगाव : मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बेळगाव भाजपने शनिवारी सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. भाजप महानगर व ग्रामीणच्या वतीने रास्ता रोको, जेलभरो आंदोलन तसेच बी. नागेंद्र यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. गेल्या सहा-सात दिवसांपासून …

Read More »

इस्कॉनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने येत्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान या आंतर शालेय स्पर्धा तीन गटांमध्ये होतील. त्यामध्ये गट ए पहिली ते चौथी, गट बी पाचवी ते …

Read More »

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधव यांची मागणी

  केसरेकर कुटुंबियांच्या पाठिशी मी ठामपणे उभा बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा मोहन केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले असून, या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) बेळगाव शाखेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा १३वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी पाळण्यात आला. यावेळी उपस्थितांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला अभिवादन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. गिरीश संकुलातील भगतसिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिस …

Read More »

तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी (दि. २२) सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज …

Read More »

श्रावणातील दुसरा शुक्रवार भक्तिभावाने साजरा; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

  बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासातील दुसरा शुक्रवार महिलांनी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला. श्रावणातील दुसरा शुक्रवार विशेषतः वरलक्ष्मी शुक्रवार म्हणून आचरण केला जात असल्याने घरोघरी लक्ष्मीपूजन आणि व्रत करण्यात आले. पतीला दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबात सुख-समाधान नांदावे, अशी प्रार्थना करत महिलांनी उपवास करून वरलक्ष्मीचे व्रत …

Read More »

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेसाठी बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. दि ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने सुमारे २३ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी २७.९२ कोटी रुपयांचे खेळते …

Read More »