Friday , August 21 2026
Breaking News

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love

 

बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेसाठी बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
दि ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने सुमारे २३ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी २७.९२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल व १२४.४५ कोटीची वार्षिक उलाढाल करीत सुमारे २१,६५,७९५.६६ रुपये इतक्या विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. तसेच सभासदांना 8% लाभांश देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
संस्था स्थापनेपासूनच सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून एकांकिका स्पर्धा व एस एस एल सी व्याख्यानमाला यांचे सातत्याने आयोजन करीत असते.
प्रारंभी चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्तविक व स्वागत करून सभेची सुरुवात केली.
विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा साधत त्यांचे विवेचन करून सभासदांचे यावेळी समाधान करण्यात आले.
संचालक शरद पाटील यांनी प्रगतीचा आढावा घेतला.अहवाल वर्षात वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या अमित कल्लीमनी व प्रशांत दळवी यांचा सत्कार शाम सुतार व शिवाजीराव अतिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक सर्वश्री संजय चौगुले,रामकुमार जोशी,लक्ष्मीकांत जाधव,सौ नंदा कांबळे व भाग्यश्री जाधव यांच्याबरोबरच संस्थेचे समस्थ अधिकारी,कर्मचारी, व पिगमी संकलक उपस्थित होते
सभेचे कामकाजास सेक्रेटरी सौ स्नेहल चौगुले सूत्रसंचलन केले तर संचालक संजय चोगुले यांच्या आभार प्रदर्शनानी सभेची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा

Spread the love  मुदतठेवींचे नूतनीकरण करण्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांचे आवाहन बेळगाव : श्री तुकाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *