Friday , August 21 2026
Breaking News

बोरगाव शेतकऱ्यांच्या मागणीची लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांकडून दखल: शेतकऱ्यांनी मानले आभार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे घोसरवाड सीमा लागत असलेला जुना बंधारा दुरुस्ती करण्यासह शेतकऱ्यांसाठी नवीन बंधारासाठी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी बोरगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे ठरवले होते. याची दखल घेत लोकप्रतिनिधी व संबंधित पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी शेतकरी बांधवांकडून आपण लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानत असल्याचे शेतकरी नेते तात्यासाहेब बसन्नावर यांनी सांगितले.
बोरगाव येथे आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
सुनील नांगरे पाटील म्हणाले, बोरगाव शहराला दूधगंगा नदीचे वरदान आहे. पण उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असते. धरण नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी समस्या उद्भवत असते. यंदा पाऊस कमी असल्याने येणाऱ्या काळात त्रास सहन करावा लागणार आहे. याची दखल घेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकप्रतिनिधी व पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरवले होते. याबाबत त्यांना कल्पनाही देण्यात आले होते. याची दखल घेत त्या ठिकाणी जुना बंधारा रिपेरी करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकप्रतिनिधींनी नवीन बंधारा निर्मितीसाठी प्रयत्न करू असे सांगितल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी रमेश मालगावे, अभिनंदन फिरगन्नावर, शितल सोबाणे, भरत हवले संदीप चिप्रे, आदिनाथ जंगटे, भरत हवले, संदीप बसन्नावर, अमित बसन्नावर, उदय पवार, यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

नवीन बंधारा निर्मितीसह जुन्या बांधाराच्या दुरुस्तीसाठी बोरगावमध्ये शेतकऱ्यांची बैठक

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती करण्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *