Friday , August 21 2026
Breaking News

देशासाठी राजीव गांधी यांचे कार्य महत्वपूर्ण

Spread the love

 

रोहन साळवे; निपाणीत राजीव गांधी यांची जयंती कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची दूरदृष्टी आणि युवा शक्तीवरील विश्वास प्रेरणादायी आहे, असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी व्यक्त केले. येथील काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी रोहन साळवे व निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

साळवे म्हणाले, राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान, शिक्षण, दळणवळण आणि प्रशासनाच्या आधुनिकीकरणाला चालना दिली. देशातील तरुणांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगितले.
यावेळी राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस वर्षा चव्हाण, अस्लम शिकलगार, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, विजय शेटके, झाकीर कादरी, रवींद्र श्रीखंडे, ॲड. एस. एस. चव्हाण, रघुनाथ नायकवडी, दीपक सावंत, लोकेश घस्ते, विश्वास पाटील, किरण पाटोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयातही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले. राजीव गांधी यांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान, दूरदृष्टी आणि युवा शक्तीवरील विश्वास सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी सुजय पाटील, सुप्रिया पाटील, बाबुराव साखरे, बबन गोसावी, निलेश येरुडकर, प्रशांत हांडोरी, संदीप इंगवले, इंद्रजित बगाडे, बाबुराव घस्ते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पार्श्वमतीमती विद्यालयात समंतभद्र महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालय अक्कोळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *