
निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे निपाणी- मुरगूड रोडवर देवचंद काॅलेज मुख्य गेट लगत असणाऱ्या फुटपाथवर सर्वांचे वापरासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. एकूण बारा बाक बसवले जाणार असून सर्व बाकांवर छत करण्यात येणार आहे.
यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, विश्वास मुधाळकर, व्यंकटराव पाटील, श्रीपती चौगुले, पांडुरंग चव्हाण, गुंडू हेगडे, सुभाष डांगरे उपस्थित होते. या सामाजिक कार्याबद्दल जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जनतेतून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta