
निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेच्या शाळा व्यवस्थापन व सुधारणा समितीची मुदत संपली होती. त्यामुळे पुढील तीन वर्षासाठी नवीन एसडीएमसी अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक. ए ए. मोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर सदस्यासाठी १८नावे बिनविरोध निश्चीत करून एसडीएमसी ची रचना करण्यात आली. उपाध्यक्षपदी सलमा जमादार यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदस्यपदी अमित हरेल संतोष पाटील, पंडीत हरेल, नितीन माने, राजवैभव हरेल, आतिष पाटील, सागर पवार, उत्तम पाटील, संगिता चौगुले, नेहा पाटील, प्राजक्ता आवटे, रेणू जगताप, सौजन्या चव्हाण, दिपाली मधाळे, माधुरी पाटील, रोहिणी शिंदे यांची निवड करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta