Friday , August 21 2026
Breaking News

श्रावणातील दुसरा शुक्रवार भक्तिभावाने साजरा; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

Spread the love

 

बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासातील दुसरा शुक्रवार महिलांनी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला. श्रावणातील दुसरा शुक्रवार विशेषतः वरलक्ष्मी शुक्रवार म्हणून आचरण केला जात असल्याने घरोघरी लक्ष्मीपूजन आणि व्रत करण्यात आले.

पतीला दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबात सुख-समाधान नांदावे, अशी प्रार्थना करत महिलांनी उपवास करून वरलक्ष्मीचे व्रत श्रद्धेने केले. घरांमध्ये लक्ष्मीची पूजा, सजावट आणि नैवेद्याची तयारी करण्यात आली होती.

श्रावणातील सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुरुवारी सायंकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. शुक्रवारीही बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. पूजा साहित्य, फुले, पाने, फळे, श्रीफळ, देवीचे मुखवटे, वस्त्रे तसेच विविध पूजासाहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

महिलांकडून वरलक्ष्मी व्रतासाठी उपवास केला जात असल्याने बाजारात उपवासाच्या पदार्थांनाही मोठी मागणी होती. मात्र, श्रावण मास सुरू होताच उपवासाचे पदार्थ, फळे आणि फुलांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे श्रावणातील सण-समारंभांनाही महागाईची झळ बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

देसूरमध्ये गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

Spread the love  देसूर : देसूर गावातील मुख्य रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *