Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

मृत व्यक्तीच्या बनावट स्वाक्षरीने ७२ गुंठे जमीन विकल्याचा आरोप; एकाला अटक

  बेळगाव : जमीन मालकाचा तब्बल ६० वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतानाही त्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ७२ गुंठे जमीन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी विष्णू कृष्णराव पाटील (६७, रा. लक्ष्मी नगर, बाळेकुंद्री, के.एच., बेळगाव) याला अटक केली आहे. या प्रकरणी बसय्या बाळय्या पूजेरी (रा. कुरुबर …

Read More »

रेनाॅटस् वेलनेसच्या आरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद

  बेळगांव : स्कायहायच्या सौजन्याने येथील रेनॉटस् वेलनेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चांगल्या व निरोगी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पुण्याच्या सौ. प्रज्ञा बिर्जे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. प्रारंभी जी. एस. एस. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजक सुहास देशपांडे यांनी प्रारंभी आरोग्याविषयी सखोल …

Read More »

15 वर्षांनंतर मारीहाळमध्ये महालक्ष्मी यात्रा: यात्रेची तयारी आणि भाविकांच्या सुविधांबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांची बैठक

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मारीहाळ गावात सुमारे 15 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा महोत्सव होणार आहे. यात्रा यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने मतदारसंघाच्या आमदार तथा माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी यात्रा कमिटीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रमुख नेत्यांसोबत पूर्वतयारी बैठक घेतली. मारीहाळ येथील श्री …

Read More »

साठे प्रबोधिनी मराठी हस्ताक्षर, व्याकरण व निबंध स्पर्धेला ६६७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर, व्याकरण व निबंध स्पर्धेला तब्बल ६६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान निर्माण करण्याबरोबरच शुद्धलेखन, सुंदर हस्ताक्षर, व्याकरणाचे ज्ञान आणि सर्जनशील लेखनकौशल्य विकसित …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : लक्ष्मीनगर हिंडलगा येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा गणेशपुर शाळा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय मलखांब व रोप मलकांब स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला, 4 जिल्ह्यातील पन्नासहून अधिक मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या …

Read More »

गृहज्योती पुनर्तपासणीसाठी २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान सहा ठिकाणी विशेष कॅम्प

  बेळगाव : बेळगाव शहरातील गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी हेस्कॉमतर्फे २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. गृहज्योती योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी घरोघरी जाऊन नोंदणी व कागदपत्रांची तपासणी केली होती. मात्र, काही घरांमध्ये घरमालकांची भेट न झाल्याने पुनर्तपासणीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना ही …

Read More »

येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक मंगळवारी

  येळ्ळूर : येथील ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा श्रावण मासानिमित सालाबादप्रमाणे मंगळावर दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ८ वाजता कलस मिरवणूक श्री चांगळेश्वरी मंदिरपासून निघणार असून मिरवणूकीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरमध्ये उपस्थित रहावे. मिरवणुकीनंतर सकाळी ९ वाजता अभिषेक होणार …

Read More »

रहदारी नियमांची ऐसीतैसी! बेळगाव जिल्ह्यात २.३३ लाख वाहनधारकांवर कारवाई

  हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक; ८,३०० अल्पवयीन वाहनचालक पोलिसांच्या रडारवर बेळगाव : रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांना आळा बसावा आणि वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही वाहनधारकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यात …

Read More »

प्राचार्य नाही, निर्णयांना विलंब! डाएटचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर

  बेळगाव : जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), मन्नूर येथील प्राचार्यपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. जून महिन्यात तत्कालीन प्राचार्य निवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे डाएटच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, …

Read More »

१५ दिवस शवागृहात असलेल्या अनोळखी मृतदेहाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप

  बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्तीची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कोणीही पुढे न आल्याने बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या उपक्रमासाठी अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद …

Read More »