Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; अधिकाऱ्यांना केल्या कार्यवाहीच्या सूचना

  बेळगाव : माजी मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी बेळगाव येथील आपल्या गृह कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक गृह कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्यांबाबत अर्ज साद केले. लक्ष्मी …

Read More »

मूळ मालक असल्याचे भासवून शेती जमीन विकली; ६४ वर्षीय आरोपी अटकेत

  बेळगाव : मूळ जमीन मालक असल्याचे भासवून दुसऱ्याच्या नावावर असलेली शेती जमीन परस्पर विक्री करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून ६४ वर्षीय व्यक्तीला बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख आनंद मोरे (६४), कलमेश्वर गल्ली, सोनारवाडी, खानापूर तालुका, बेळगाव जिल्हा अशी झाली आहे. याप्रकरणी उद्यमबाग, बेळगाव …

Read More »

अनैतिक संबंधाच्या संशयातून निर्घृण हत्या

  बेळगाव : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कळ्ळोळी गावात घडली. या घटनेत गुजनट्टी गावातील रमेश हणमंत बंट्रोळी यांचा मृत्यू झाला असून, कळ्ळोळी येथील बनप्पा रामचंद्र वडेर याच्यावर हत्येचा आरोप आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बंट्रोळी आणि …

Read More »

भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर लोकगीत स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने …

Read More »

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कचऱ्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, कचरा टाकण्याचे व वर्गीकरणाचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी समाज सारथी संघटनेच्या …

Read More »

कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या; केसरेकरांच्या अनाथ मुलांना शासकीय मदतीची मागणी

  बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या दोन मुलांना शासकीय मदत व कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली. या मागणीसाठी शिष्टमंडळाने सोमवारी …

Read More »

मतदार यादीचा मसुदा सर्व तहसीलदार, तालुका पंचायतींमध्ये प्रकाशित : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष व्यापक सुधारणेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारी मतदार यादीचा मसुदा अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. मतदार यादीच्या विशेष व्यापक सुधारणेसंदर्भात आणि मतदार यादीच्या मसुद्यासंदर्भात सोमवारी (२४ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५ लाख ८९ हजार ३८० रुपये किमतीचे ४१.४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २२ हजार १४६ रुपये किमतीचे ९३.४५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ६ लाख ११ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ४ …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मच्छे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

  मच्छे : दरवर्षीप्रमाणे मच्छे येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेतील एलकेजी, युकेजी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना तसेच लक्ष्मीनगर, मच्छे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गजानन छप्रे होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष श्री. सचिन …

Read More »

बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे पीक नुकसानीवर वडगावात शेतकऱ्यांची बुधवारी बैठक

  बेळगाव : बेळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर आणि अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाउंड, वडगाव येथे होणार …

Read More »